Pakistan Vs Afghanistan | नगर : पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर (Afghanistan) मोठा हवाई हल्ला केला असून या हल्ल्यात काही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यात पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर तहरीक-ए-तालिबानच्या सात अड्ड्यांवर हल्ला केले आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात १९ जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्याबाबत पाकिस्तानकडून माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रत्युत्तर देणार असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला आहे.
अवश्य वाचा- १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!
सात ठिकाणांवर हल्ले (Pakistan Vs Afghanistan)
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी रविवारी (ता. २२) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने गुप्तचर माहितीच्या आधारे तहरीक-ए-तालिबान आणि त्याच्या सहयोगी संघटनांच्या ७ ठिकाणांवर हल्ले केले असल्याची माहिती अताउल्लाह तरार यांनी दिली.
हे दहशतवादी अड्डे अफगाणिस्तान सीमेवर स्थापित केले गेले होते, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो असं देखील अताउल्लाह तरार यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा- वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांसाठी टीटीपी जबाबदार (Pakistan Vs Afghanistan)
पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी असाही दावा केला की, अफगाणिस्तान सीमेजवळील लक्ष्यित हल्ले तेच ठिकाण होते जिथे पाकिस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यात आले होते आणि जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व हल्ल्यांना आणि स्फोटांना टीटीपी जबाबदार आहे. म्हणूनच, लष्कराने टीटीपीवर हल्ला केला आणि इस्लामिक स्टेट (आयएस) चे दहशतवादी देखील या दहशतवादी तळांमध्ये आश्रय घेत आहेत.



