Panan Mahasangh : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

Panan Mahasangh : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

0
Panan Mahasangh : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी
Panan Mahasangh : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

Panan Mahasangh : नगर : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने (Panan Mahasangh) तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे. ९ केंद्रावरून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी (Panan Officer) बी.आर. पाटील यांनी दिली आहे.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

१३ फेब्रुवारी पासून खरेदी प्रक्रिया सुरू (Panan Mahasangh)

हंगाम २०२४-२५ साठी तूर या पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दराने १३ फेब्रुवारी पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ९ केंद्रावरून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. शेवगाव तालुक्यामध्ये सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी बोधेगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्ड पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी घारगाव, रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राहुरी, पारनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पारनेर, कोपरगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कोपरगाव तर जामखेड तालुक्यात चैतन्य कानिफनाथ फळ प्र. सहकारी संस्था खर्डा उपबाजार समिती येथे नोंदणी करण्यात येईल.