panchayat samiti office : पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

panchayat samiti office : पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
panchayat samiti office : पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
panchayat samiti office : पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

panchayat samiti office : पाथर्डी : पाथर्डी (Pathardi) पंचायत समिती कार्यालयातील (panchayat samiti office) अधिकारी व कर्मचारी यांना शिस्त व जबाबदारीची जाणीव राहिलेली नसल्याचे धक्कादायक (Shocking) चित्र सध्या समोर आले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या पंचायत समिती इमारतीची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. कार्यालयीन आवारात सर्वत्र अस्वच्छता (Uncleanliness), अस्ताव्यस्त पडलेले साहित्य व बेजबाबदारपणाचे दर्शन घडत आहे.

नक्की वाचा:  अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांचा मास्टरप्लॅन; कृष्ण प्रकाशांनी टाकलं निर्णायक पाऊल

कार्यालय परिसरात दुर्गंधी

पंचायत समितीच्या कार्यालयातील खिडक्या मावा, तंबाखू व गुटखा खाऊन थुंकून घाण केल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंतींवरचे थुंके स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे संपूर्ण कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना कार्यालयात येणेही नकोसे वाटत आहे. कार्यालयातील अंतर्गत वायरिंग अनेक ठिकाणी लोंबत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.कार्यालयात वापरात असलेले कपाट, टेबल, खुर्च्या आदी फर्निचर पूर्णतः विस्कळीत अवस्थेत पडलेले आहे. शासनाच्या विविध योजनांची जाहिरात करणारी फलके केवळ नावापुरती लावण्यात आली असून त्यावर प्रत्यक्षात कोणतेही प्रभावी कामकाज होत नसल्याचे चित्र आहे.

अवश्य वाचा: श्री साईबाबा संस्थानला साईभक्ताने देणगी स्वरूपात स्कूल बस केली अर्पण

हुकूमशाही पद्धतीने कारभार (panchayat samiti office)

दरम्यान, पंचायत समितीतील एक अधिकारी स्वतःला जणू ‘कलेक्टर’ असल्याप्रमाणे वागत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. तो  आपल्या वरिष्ठांची दिशाभूल करून कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मलिदा गोळा करण्यात व्यस्त आहे. मी म्हणेल तसेच झाले पाहिजे अशा हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप होत आहे. ज्यांनी मलिदा दिला, त्यांच्याच वैयक्तिक योजनांचे प्रस्ताव मार्गी लावले जात आहेत. सामान्य नागरिकांना कामासाठी वारंवार वेळकाढूपणा सहन करावा लागत आहे. तालुक्यातील विविध गावांतून पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ गरजू घटकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.