Pandharpur : राहुरी: संत कवी महिपती महाराज (Sant Kavi Mahipati) दिंडीचे ताहाराबादहून पंढरपूरकडे (Pandharpur) उत्साहात प्रस्थान झाले. हरीनामाच्या गजरात आणि अभंग गात, सनई चौघडा वाद्यांच्या गजरात दिंडीचे (Dindi) आज राहुरीत स्वागत झाले. रिमझिम पावसानेही यावेळी हजेरी लावली.
नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू
ही दिंडी पांडुरंगाला ताहाराबादला आणण्यासाठी जाते
महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील असंख्य वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. परंतू नगर जिल्हयातील ताहाराबाद येथील संत महिपती महारांजाची दिंडी ही प्रत्यक्ष पांडुरंगाला ताहाराबादला आणण्यासाठी जात असते. या दिंडी प्रस्थानचे हे 296 वे वर्ष आहे. सुमारे चार पाच हजार वारकरी असणारी राहुरी तालुक्यातील सर्वात मोठी दिंडी आहे. दिंडी प्रस्थानवेळी महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे , दिंडीचे अध्यक्ष नाना महाराज गागरे, उपाध्यक्ष बाळकृष्ण महाराज कांबळे तसेच पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
पादुकांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन (Pandharpur)
महिपती महाराजांच्या पादुकांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. ताहाराबाद येथील महिपती माध्यमिक विद्यालयाचे लेझीम पथक व माऊलीचा अश्वही दिंडीत आहे. राहुरीत उद्योजक सतीश काका तनपुरे यांनी सपत्नीक दिंडीचे ,पादुकांचे पूजन केले. त्याआधी एल.बी. म्हसे यांचे वस्तीवर वारकऱ्यांना नाष्टा दिला गेला. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, बाजार समिती संचालकांनी दिंडीचे स्वागत केले. राहुरी एम पी सोसायटीत माजी आमदार चंद्रशेखर कदम, सेवा संस्था अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच चाचा तनपुरे यांनी दिंडीचे स्वागत केले. विश्वस्त एस.एच.बंगाळ, माजी संचालक मच्छिंद्र कोहकडे, सुरसिंगराव पवार आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.