Pandharpur : श्रीगोंदा : तालुक्याचे आराध्य दैवत सद्गुरू श्री संत शेख महंमद महाराज (Sant Shaikh Mahamad Maharaj) पालखी सोहळ्याचे यात्रा उत्सव प्रतिष्ठानच्या वतीने घनशाम शेलार व तुकाराम महाराज यांवे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा (Shrigonda) शहरातून सवाद्य मिरवणुकीने श्री क्षेत्र पंढरपूरकडे (Pandharpur) नगर प्रदक्षिणा होऊन प्रस्थान झाले.
अवश्य वाचा: जिल्हादंडाधिकाऱ्यांचे १२ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पायी दिंडी सोहळ्यांचे सर्व स्तरातून कौतुक
श्रीगोंदेकारांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या वाटचालीत आणखी एक पाऊल पुढे टाकत श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पादुकांचा श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा सुरू करण्याचा निर्णय घेत पायी दिंडी सोहळ्याचे पहिले वर्ष यशस्वी होऊन दुसऱ्या वर्षाच्या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पायी दिंडी सोहळ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पालखी सोहळ्यामुळे संत शेख महंमद महाराज आणि पंढरीच्या विठुरायाची भेट होणार आहे. गुरुवारी (ता.४) पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर बुधवारी (ता.१०) इंदापूर येथे जगदुरु श्री संत तुकाराम महाराज व सदुरु श्री संत शेख महंमद महाराज पालखी भेट दुपारी तीन वाजता होणार आहे. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही पालखीची भेट होणार आहे. सदगुरु श्री संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे रिंगण पळसदेव, लोणीदेवकर, अकलूज, वेळापूर, वाखरी या ठिकाणी अश्व रिंगण सोहळा होईल. ही एक भक्तांसाठी खूप मोठी आनंदाची भेट असणार आहे. या पालखी सोहळ्याचे सर्वच स्तरातून सक्रिय सहभाग लाभत आहे. सोहळ्याला मोठ्या प्रमाणात अन्नदाते अन्नदान देणार आहेत तर डॉक्टर व मेडिकल व्यावसायकांनी या पालखी सोहळ्यासाठी मोफत औषधे व आरोग्य व्यवस्था उपलब्ध करत भाविकांची सेवा करणार आहेत.
नक्की वाचा: शालिनी विखे पाटलांचे पांडुरंगाला साकडे; पाऊस पडू दे.. शेतकरी सुखी होऊ दे.. संकटे दूर कर
पाळखी सोहळ्यासाठी घेतले विशेष परिश्रम (Pandharpur)
या आषाढी पालखी सोहळ्यासाठी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, कुकडी कारखाना संचालिका डॉ. प्रणोती जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, ऋषिकेश शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, सुनीता शिंदे, अशोक खेंडके, बापू गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक आदी मान्यवरांसह भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाळ मोटे, उपाध्यक्ष अशोक आळेकर, सचिव जगन्नाथ आव्हाड, खजिनदार किसन आघाव, मनोहर पोटे, शहाजी खेतमाळीस, सतिष मखरे, सुदाम झुजरुक, नाना कोशिंबिरे, चंद्रकांत कटारीया यांनी या पाळखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.