Pandharpur : राळेगणसिद्धी येथील तरुणांची पुणे ते पंढरपूर पायी वारी; चार दिवसांत २१० किमी अंतर प्रवास

Pandharpur : राळेगणसिद्धी येथील तरुणांची पुणे ते पंढरपूर पायी वारी; चार दिवसांत २१० किमी अंतर प्रवास

0
Pandharpur : राळेगणसिद्धी येथील तरुणांची पुणे ते पंढरपूर पायी वारी; चार दिवसांत २१० किमी अंतर प्रवास
Pandharpur : राळेगणसिद्धी येथील तरुणांची पुणे ते पंढरपूर पायी वारी; चार दिवसांत २१० किमी अंतर प्रवास

Pandharpur : नगर : आषाढी वारीची (Ashadhi wari) आठशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. लाखोंच्या संख्येने वैष्णवांकडून पंढरपूर (Pandharpur) पायी वारीचे २५० किलोमीटर एवढं अंतर ठराविक अवधीमध्ये पार केले जाते. या वारीमुळे महाराष्ट्राचं (Maharashtra) आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध झालेले आहे, अशा या वारीचे २१० किमीचे अंतर राळेगणसिद्धी येथील जयसिंग मापारी, सुनील मापारी, ज्ञानेश्वर मापारी, एकनाथ भालेकर, सुभाष गाजरे या वारकऱ्यांनी केवळ चार दिवसांतच मजल दरमजल करत पूर्ण केले आहे.

नक्की वाचा: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत

पुणे ते पंढरपूर पायीवारी

हे तरुण बुधवारी (ता. ३) सकाळी ८ वाजता हडपसर, पुणे येथून सुरू झालेली ही पायीवारी जेजुरी (पुणे), काळज (सातारा), मोरोची (सोलापूर), वेळापुर (सोलापूर) असा प्रवास करत पंढरपूरमध्ये रविवारी (ता. ७) दुपारी एक वाजता पांडुरंगाच्या दरबारात पोहोचले. तर सुभाष गाजरे यांनी पुणे ते नीरा असे जवळपास १०० किमीचे अंतर पूर्ण केले. मात्र तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे त्यांना पुढील वारी पूर्ण करता आली नाही. पुढील वर्षी ही वारी पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

अवश्य वाचा: फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

सर्व स्तरांतून या वारकऱ्यांचे कौतुक (Pandharpur)

ज्ञानेश्वर मापारी, सुनील मापारी, एकनाथ भालेकर, सुभाष गाजरे यांच्या संकल्पनेतून हा पायी वारीचा उपक्रम राबविण्यात आला होता. तसेच २०२३ साली जयसिंग मापारी यांनी आपल्या मोठ्या बहिणीसोबत पायी वारी केली असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांनाच झाला. या सर्वांनी चार दिवसांत २१० किमी पायी वारी पूर्ण केल्याने सर्व स्तरांतून या सर्व वारकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here