Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

0
Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला
Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

Pandharpur : नगर : संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) यांची पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेली पालखी आज फलटणला आहे. तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची पालखी इंदापूरला आहे. १४ एप्रिल रोजी पंढरपूरातील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका  लंडनच्या दिशेने निघाल्या होत्या. लंडनमधील विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांनी २२ देशातून ७० दिवसांत १६ हजारहून जास्त किलोमीटरचा प्रवास करून या पादुका नुकत्याच इंग्लंडमध्ये (England) आणल्या आहेत. 

Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला
Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका

इंग्लंडमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्याचे नियोजन

इंग्लंडमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे पहिले भव्य मंदिर बांधण्याचे नियोजन या मंडळींनी केले आहे. आता या पादुका सगळ्या इंग्लंडभर जिथे जिथे मराठी माणसे आहेत त्या शहरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. थेट विठ्ठलाच्या पादुका आपल्या दारी अशी योजना या मागे आहे.

Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला
Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

वॉरिक येथील ‘लॅमिंग्टन स्पा’ मधील ‘कॅम्पियन स्कूल’ मध्ये या विठ्ठलाच्या पादुका रविवारी (ता. २९) दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन लॅमिंग्टन मराठी या मराठी लोकांनी सुरू केलेल्या संस्थेतर्फे करण्यात आले होते.

Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला
Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक (Pandharpur)

८३ दिवसांनी  इंग्लंड मधील लॅमिंग्टन मराठीच्या कार्यक्रमात पादुकांचे दर्शन घेता आले आणि या सोहळ्यात सहभागी होता आले. रविवारी (ता. २९) दुपारी ३ वाजता ‘लॅमिंग्टन स्पा ‘ मधील अनेक मराठी कुटुंब एकत्र जमली होती. पालखी सजली होती त्यात पादुका आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवल्या होत्या. हातात पताका घेतलेला तरुण होता. छोटी मुले सगळ्यात पुढे वेशभूषा करून उभी होती. ढोल ताशाच्या गजरात पालखीला सुरुवात झाली. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला दिसत होत्या. कपाळावर गंध, डोक्यावर टोपी आणि पारंपरिक वेश परिधान करून मराठी मंडळी कुटुंबासहित दिंडीमध्ये सामील झाली होती. पुढे शाळेच्या मोकळ्या मैदानात एक ‘रिंगण ‘ झाले. महिलांनी फुगड्या घातल्या.पंढरपूरच्या वाटेवर नातेपुते येथे होणाऱ्या रिंगणाची आठवण झाली.

Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला
Pandharpur : पंढरपुरातून निघालेल्या विठ्ठलाच्या पादुका पोहोचल्या इंग्लंडला

शाळेच्या हॉल मध्ये पादुका ठेवण्यात आल्या. अभंग, गाणी याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी भक्ती भावाने गाणी सादर केली.हरिपाठ झाला. लोकांनी पादुका दर्शन घेतल्यावर आरती झाली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.