Pandharpur Temple:कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आज पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

0
Pandharpur Temple:कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी
Pandharpur Temple:कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी

Pandharpur temple : कार्तिकी यात्रेच्या (Kartiki Yatra) निमित्ताने आज पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukmini Temple) विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज पहाटे २:३० वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Mahapuja) विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पार पडली. या पूजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून उदगीर येथील बाबुराव यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

नक्की वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार  

पंढरपुरात भाविकांची मांदियाळी (Pandharpur Temple)

देवूठाणी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यालाच विष्णु-प्रबोधिनी, देव प्रबोधिनी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि कार्तिकी एकादशी असेही म्हणतात, जी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आज दशमीला जवळपास ५ ते ६ लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत.

विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गुलाब, अष्टर, झेंडू, मोगरा,गुलछडी यांसह विविध पाना फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट विठ्ठल प्रवेशद्वार, चौखांबी, सोळखांबी आदी ठिकाणी करण्यात आली. तसेच मंदिर समितीने विठ्ठल मंदिर आणि परिसरात रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

अवश्य वाचा :  बापरे!गुजरातमध्ये चक्क वॅगनर कारवर अंत्यसंस्कार,जाणून घ्या..   

पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची स्वारी  (Pandharpur Temple)

विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग तीन किलोमीटर अंतरावर गेलीय. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ६-७ तासांचा वेळ लागतोय. कार्तिकीसाठी येणाऱ्या भाविकांना विक्रीसाठी ८ लाख बुंदीच्या लाडूचा प्रसाद बनवण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्ताने पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकरी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here