Pankaj Ashiya : नगर : जलव्यवस्थापन (Water Management) कृती पंधरवड्यात कृषी विभागाने (Agriculture Department) पाणी वापर संस्थांसोबत समन्वय साधून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर द्यावा आणि सर्व विभागांनी मिळून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी केले.
नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला
जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन
नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, संतोष सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, (Pankaj Ashiya)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी समन्वयाच्या माध्यमातून उद्दिष्टानुसार कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग घ्यावा.
जिल्ह्याला उन्हाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागते. शेतीसाठी पाणी आवश्यक असताना जिल्ह्याच्या विविध भागात पाण्याचे असमान वितरण आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून द्यावे लागेल. जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. प्रमुख नद्यांचे पुनरूज्जीवन लोकसहभागातून करण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे ही त्यांनी म्हटले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचे महत्व समजावणे आणि गावातील पाण्याचे बजेट तयार करणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता असताना पाणी उपचारावरही भर देण्यात यावा. सर्व विभागांनी केवळ १५ दिवस उपक्रम न राबविता वर्षभर निश्चित उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजनावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.