Pankaj Jawale : नगर : महापालिका आयुक्त डाॅ. पंकज जावळे (Pankaj Jawale) यांनी बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर ताेफखाना पाेलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखला झाला. दाखल गुन्ह्यात नगर जिल्हा न्यायालयाने जावळें यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर आता जावळे यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात ३१ जुलैला सुनावणी होणार आहे.
नक्की वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल
गुन्हा दाखल झाल्यापासून पसार
नगर -कल्याण रस्त्यावरील एका जागेवर बांधकामाला परवानगी देण्यासाठी जावळे व त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांनी आठ लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात २७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून दोघेही पसार आहेत.
अवश्य वाचा: कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस (Pankaj Jawale)
जावळे यांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरूवारी (ता. १८) सुनावणी होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. यावर आता ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. श्रीधर देशपांडे यांच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.