Pankaja Munde : प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही – पंकजा मुंडे

Pankaja Munde : प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही - पंकजा मुंडे

0
Pankaja Munde

Pankaja Munde : नगर : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपकडून (BJP) महाराष्ट्राची पहिली यादी काल (बुधवारी) जाहीर झाली. यात यादीत खासदार प्रितम मुंडे यांच्या ऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज पत्रकारांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना या उमेदवारीवर प्रश्न विचारले. त्यावेळी खासदार प्रितम मुंडे उपस्थित होत्या.

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा

पंकजा मुंडे म्हणाल्या (Pankaja Munde)

काल उमेदवारी जाहीर झाली. एवढ्या मोठ्या पक्षाकडून उमेदवारी मिळणे तेही महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये नाव असणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. थोडी संमिश्र भावना आहे. प्रितम मुंडे खासदार असताना मी राज्याचे काम करत होते. केंद्राच्या राजकारणात पक्ष प्रभारी म्हणून मला काम केल्याचा अनुभव मिळाला आहे. नवीन मतदार संघ असल्याने थोडी धाकधूक आहे. मला लोकसभेची जागा मिळेल अशी चर्चा होती. मात्र उमेदवारी मिळेल असा विश्वास नव्हता.

नक्की वाचा : नगरच्या विकासासाठी अजित पवारांनी संग्राम जगतापांना दिले ९४ कोटीचे बंपर गिफ्ट

त्या पुढे म्हणाल्या (Pankaja Munde)

प्रितम मुंडे या ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरकीचे चांगले करिअर सोडून दहा वर्षे राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. मी धोरणात्मक निर्णय घेत होते तर त्या व्यक्तिगत गोष्टींवर काम करायच्या. त्यामुळे आमच्या दोघींत कॉम्बिनेशन चांगले होते. प्रितम मुंडे खासदार असताना पाच वर्षे मी घरी बसले त्याचाही मला अनुभव आहे. मात्र, मी प्रितमला विस्थापित करणार नाही. बीडची जनता काय करते यावर महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष राहील.


धनंजय मुंडे यांचा पक्ष व आमचा पक्ष यांची युती आहे. त्यामुळे मला मताधिक्य मिळवून आणण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. आम्हा बहीण-भावांत चांगला संवाद आहे. मी सर्व समाजाला घेऊन काम केले आहे. फक्त आपल्या समाजापूर्ता विकास करण्याचे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत. मराठा आरक्षणाबाबत मी समतोल भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here