Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले भाकीत

Pankaja Munde

0
Pankaja Munde

Pankaja Munde : नगर :  भाजप (BJP) तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हेच नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा बाजी मारतील, असे भाकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा: अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा; संजय राऊत यांचा खाेचक सवाल

मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Pankaja Munde)

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी पाथर्डी येथे मोहटा देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी अहमदनगर लाेकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: महत्त्वाची बातमी! नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल; असा असेल बदल

जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी (Pankaja Munde)

पंकजा मुंडे यांचे काल (गुरुवारी) रात्री नगर शहरात आगमन झाले. त्यांनी बुऱ्हाणगर येथे शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. त्यांनी आज सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजी कर्डिले यांचा क्रेनच्या साहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी दिल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ”डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षांचा कालावधी हा विविध विकासकामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल, हा मला विश्वास आहे. मागील निवडणुकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आहे. मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

मोहटा देवीचे दर्शन

त्यांनी डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here