Pankaja Munde : बजरंग सोनवणेंच्या उमेदवारीवर पंकजा मुंडे म्हणाल्या…

Pankaja Munde

0
Pankaja Munde

Pankaja Munde : नगर : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) आचार संहिता जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपने अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नगर जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. या वेळी त्यांच्याशी उपस्थित पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil), माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile), आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा: अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा; संजय राऊत यांचा खाेचक सवाल

पंकजा मुंडे म्हणाल्या (Pankaja Munde )


भाजपचा प्रचार आमचा पाचही वर्षे चालू असतो. मागील पाच वर्षांत आपण कोरोना महामारी, अतिवृष्टी झाली. या काळात आम्ही जनतेला मदत करण्याचे काम केले. प्रत्येक क्षण जनसेवेचा आहे. केलेल्या सेवेची पावती हाच प्रचार आहे. न सांगता लोकांना मागील पाच वर्षांतील आमच्या अडचणी कळत असतील, कार्यकर्ते स्वतःहून पाच लाखाचा धनादेश देत असतील तर याचा अर्थ आमचे कार्यकर्त्यांशी एक नाते तयार झाले आहे. हा धनादेश म्हणजे माझा सन्मान असल्याने तो मी स्वीकारणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde

नक्की वाचामहत्त्वाची बातमी! नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल; असा असेल बदल

सध्या बीड जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी (Pankaja Munde )


बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर त्या म्हणाल्या, लोकशाहीत निवडणुका लढताना समोर कोणी ना कोणी उमेदवार येणार आहे. आम्ही या पूर्वी सध्या आमच्या बरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय लढलो आहोत. मात्र, सध्या बीड जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती हाताळण्यात मला यश येईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here