Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

0
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

Pankaja Munde : नगर : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या ओबीसीच्या (OBC) नेत्या आहेत. त्या पराभूत जरी झाल्या तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले पाहिजे. भाजपच्या (BJP) एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजामध्ये काही काम नाही अशा लोकांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद दिले जाते. मात्र, ज्या खऱ्या ओबीसींच्या नेत्या आहेत त्यांचे पुनर्वसन केलं जात नाही. पंकजा मुंडेंचे पुनर्वसन झाले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) भाजपच्या विरोधात काम करू, असा इशाराच ओबीसी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

नक्की वाचा : विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांना कायमस्वरुपी तडीपार करा; विधीज्ञ असिम सरोदे यांची मागणी

पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनासाठी बॅनरबाजी

देशात लोकसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. यात बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली. यामध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे एकमेकांविरोधात उभे होते. मात्र, या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मुंडे यांचा पराभव सहन न झाल्याने बीडमध्ये दोन समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. पंकजा मुंडे यांना न्याय मिळावा त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आता नगर येथील पांढरीपूल येथे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनासाठी बॅनरबाजी केली.

अवश्य वाचा : नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

नाही तर येणाऱ्या काळात भाजप विरोधात काम करू (Pankaja Munde)

जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांना निकृष्ट पद्धतीची वागणूक दिली जात आहे. त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद दिली नाही तर येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात आम्ही काम करू. भाजपच्या विरोधात मतदान करू, असा इशारा देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here