Pankaja Munde : राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली पंकजा मुंडे यांची भेट

Pankaja Munde : राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली पंकजा मुंडे यांची भेट

0
Pankaja Munde : राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली पंकजा मुंडे यांची भेट
Pankaja Munde : राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली पंकजा मुंडे यांची भेट

Pankaja Munde : पाथर्डी : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ (Shevgaon-Pathardi Constituency) हा माझ्या दृष्टीने प्रतिष्ठेचा मतदारसंघ असून या मतदारसंघातून भाजपच्या (BJP) उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्यासह गेलेल्या शिष्टमंडळाला दिले. बुधवारी राजळे यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, बाळासाहेब गोल्हार, धनंजय बडे, संजय कीर्तने, नारायण पालवे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे,अप्पा शिरसाट यांनी मुंबई येथे जाऊन मुंडे यांची भेट घेतली, यावेळी मुंडे यांनी हे आवाहन केले.

अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे

मतदारसंघात स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने मुंडे यांना आमदार करत त्यांच्यावर विश्वास टाकला असून राज्यात असलेल्या अनेक मतदारसंघात स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने मुंडे यांच्यावर टाकली आहे. या पार्शवभूमीवर मुंडे यांनी राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुंबईला बोलावून घेत आपल्या मोहिमेचा श्री गणेश केला असल्याचे मानले जात आहे.

नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

मतदारसंघात घेणार प्रचारसभा (Pankaja Munde)

शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुंडे यांनी मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण व तो कोणत्या पक्षाचा असू शकू शकतो. मतदारसंघात महिला मतदारांची संख्या किती आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांची संख्या किती आहे. गेल्या पाच वर्षात राज्य व केंद्रशासनाच्या माध्यमातून कोणत्या योजना मार्गी लागल्या, कोणत्या योजना अपूर्ण आहे. कोणत्या प्रकराची विकासकामे झाली आहेत, याची माहिती घेत आजपासूनच प्रचाराला सुरवात करा, असे आदेश देत विधानसभेच्या रणधुमाळीत आपण या मतदारसंघात प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले.