Pankaja Munde : अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे

Pankaja Munde

0
Pankaja Munde : अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे
Pankaja Munde : अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे

Pankaja Munde : पाथर्डी : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकार (State and Central Government) शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. लवकरच सरकारकडून मदत केली. सर्व परिस्थितीत सरकार मधील सर्व घटक तुमच्या बरोबर असल्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्ट केले. सरकारने २,२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केली पाहणी

अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे मुंडे यांनी पाहणी केली, तर कीर्तनवाडी व खरवंडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने त्यांना सविस्तर चर्चा करता आली नसली तरी शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला. या दौऱ्यात आमदार मोनिका राजळे, धनंजय बडे, डॉ. मृत्युंजय गर्जे, मुकुंद गर्जे, अमोल गर्जे, बाळासाहेब गोल्हार, राहुल कारखेले, संजय किर्तने, नितीन किर्तन, शुभम गाडे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, आप्पासाहेब शिरसाट, रामहरी खेडकर, माणिक बटूळे, प्रदीप पाटील, तहसीलदार उद्धव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

पंकजा मुंडे म्हणाल्या, (Pankaja Munde)

या झालेल्या अतिवृष्टीमुळे तुमच्या आयुष्यावर, घरांवर आणि शेतीवर जे संकट कोसळले आहे, ते पाहून मला खूप वेदना होत आहेत. जमिनी वाहून गेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या पिकांत गाळ साचला आहे, घरांची पडझड झाली आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीत सरकार तुमच्यासोबत ठामपणे उभे आहे. राज्य सरकारने २,२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होऊ लागले आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी मी स्वतः कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. अतिवृष्टीची परिस्थिती केवळ पाथर्डीत नाही, तर सर्वत्र आहे. पूरस्थितीबद्दल मी पालकमंत्र्यांशी बोलेन. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे मंत्री मुंडे म्हणाल्या. त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडून पाथर्डी व शेवगावातील नुकसानीची माहिती घेतली. तसेच, श्रीपातवाडी पूल वाहून गेला असल्याने त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.