Pankaja Munde:मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका

0
Pankaja Munde:मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका
Pankaja Munde:मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका

Pankaja Munde : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर आता ओबीसी मंत्रिमंडळ उप समितीचीही नियुक्ती करण्यात आली. या उपसमितीच्या अध्यक्षांसह सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बैठकीनंतर बाहेर येताच मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला (Maratha) बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे,असं पंकजा म्हणाल्यात.  

नक्की वाचा : नर्तकीच्या प्रेमाखातर बीडमधील उपसरपंचाने केली आत्महत्या  

ओबीसी उपसमिती बैठकीत ओबीसींच्या हिताचे निर्णय  (Pankaja Munde)

ओबीसी उपसमिती बैठकीत आमची विस्तृत चर्चा झाली. त्यामध्ये,ओबीसी हिताच्या बाबतीत निर्णय झाले आहेत. जागृतपणे निर्णय होत आलेले आहेत, ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत, मिळणारे लाभ योजना, निधी यावर चर्चा झाली. तसेच, मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचीही चर्चा झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पुढच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले पाहिजे, निधी संदर्भात अन्याय झाला नाही पाहिजे, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. राज्यात गेली अनेक दशकं मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, आणखी लोकं ओबीसीत घेण्याचं स्वागत होत नाही. मात्र, कुणबी नोंदणीसंदर्भात आमचं कोणतंही म्हणणं नाही,असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

अवश्य वाचा :  जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?  

मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये   (Pankaja Munde)

अवैध नोंदी दिल्या जाऊ नये, यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी. तर, मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे, असेही पंकजा यांनी सांगितले. हैदराबाद गॅजेटियरचा विषय आल्यावर बंजारा समाज देखील आरक्षण मागतोय,अशात संवैधानिक चौकटीत सर्व निर्णय घेतले जावे. मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे, ओबीसींवर अन्याय होणार नाही असं ते म्हणाले, अशी माहितीही पंकजा यांनी दिली.