नगर : पंकजा मुंडेंना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देईन अन् त्यांना साताऱ्यातून निवडून आणेन, असं वक्तव्य भाजप नेते उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी केलं आहे. उदयनराजे हे बीडमध्ये (Beed) पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावरुन बोलताना उदयनराजे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
सभेत बोलताना उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, बीडकरांनी पंकजा यांना खासदार करावं, अन्यथा ते राजीनामा देतील आणि पंकजा यांना साताऱ्यामधून निवडून आणेन. मग तुमच्याकडे मी पाहून घेतो, अशी मजेशीर धमकी त्यांनी यावेळी दिली. आता पेंगा पण मतदानाच्या दिवशी पेंगू नका. नाहीतर मी तुम्हाला छळायला येणारच अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
नक्की वाचा : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘अष्टपदी’ चित्रपटाची घोषणा
पंकजांच्या सभेत उदयनराजेंनी उडवली कॉलर (Pankaja Munde)
यावेळी उदयनराजे यांनी कॉलर देखील उडवली. ही प्रचारसभा नव्हती, विजय सभा होती. पंकजा काही वेगळ्या नाहीत. माझे वडील वारल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी माझं बोट धरलं. मला आधार दिला. माझ्या गळ्याची शपथ, महाराजांची शपथ आहे. प्लिज पंकजा ताईंना निवडून द्या, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं.
अवश्य वाचा : शुभमन गिल अन् साई सुदर्शननी झळकावली शतके; गुजरातने केला चेन्नईचा पराभव
बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात (Pankaja Munde)
भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी देखील चांगला जोर लावला आहे. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांच्यासमोर बजरंग सोनवणे यांचे आव्हान असणार आहे. सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे या लोकसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.