Pankaja Munde:’सुरेश धस यांना समज द्या’;पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी 

0
Pankaja Munde:'सुरेश धस यांना समज द्या';पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी 
Pankaja Munde:'सुरेश धस यांना समज द्या';पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी 

Pankaja Munde : ‘सुरेश धस हे ज्या विषयाचा आणि माझा संबंध नाही, त्यामध्ये सातत्याने माझा उल्लेख करतात. त्यांनी माझ्याविषयी कुठलीही वैयक्तिक टिप्पणी करणे अपेक्षित नाही.पण त्यांनी ते केले. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांना समज देण्याविषयी विनंती केली होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी ‘सुरेश धसांना समज द्या’,अशा मथळ्याने बातम्या छापल्या.मात्र मी प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती,असे भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्ट केले. त्या बुधवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याविषयी अप्रत्यक्षपणे नाराजीचा सूर बोलून दाखवला.

नक्की वाचा : मोठी बातमी!खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या ? (Pankaja Munde)


पंकजा मुंडे म्हणाल्या की, सुरेश धस माझं नाव घेऊन ज्या चर्चा करतात, त्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळवले आहे. ज्या विषयात माझा संबंध नाही, त्यामध्ये माझा उल्लेख करणं, कुठलीही टिप्पणी करणं वैयक्तिक अपेक्षित नाही, ती त्यांनी करु नये. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहोचू नये, म्हणून मी गेले चार-पाच महिने नागपूर अधिवेशनापासून गप्प बसले. पण आता मी पक्षश्रेष्ठींकडे सुरेश धस यांना समज देण्याची विनंती केली,असे पंकजा यांनी सांगितले आहे.

अवश्य वाचा : आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू!

‘मी प्रचार केला नसता तर सुरेश धस निवडून आले असते का’?(Pankaja Munde)

मी विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा प्रचार केला किंवा नाही,हे रेकॉर्ड तपासून पाहा. विधानसभेला राज्यात अनेक ठिकाणी भाजपशी संबंधित लोक अपक्ष उभे राहिले होते. मी व्यासपीठावर जाऊन सुरेश धस यांना मतदान करण्याची विनंती केली होती. सुरेश धस यांना आक्षेप होता तर त्यांची प्रचार सुरु असताना माझ्यावर आरोप करायला पाहिजे होता. पण प्रत्यक्ष प्रचारात सुरेश धस यांनी माझ्याशिवाय कोणाचंही नाव घेतलं नाही. सुरेश धस हे ७५ हजार मतांनी निवडून आले, हे शक्य झालं असतं का? याउलट  मला लोकसभेला गेल्यावेळी जितकी लीड होती, ती अर्धी झाली. अनेक लोकांनी मला मदत केली नाही. पण मी तो विषय मागे सोडला. कारण जाहीरपणे याबाबत बोलणे पक्षाच्या शिस्तीला धरुन नाही.२३ नोव्हेंबरला निकाल लागल्यापासून मी याबाबत बोलणे टाळत होते,असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here