
Para National Yogasana Championship : नगर : नवी दिल्ली (New Delhi) येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय पॅरा योगासन चॅम्पियन स्पर्धेसाठी (Para National Yogasana Championship) महाराष्ट्राच्या संघाने १७ पदकासह पहिले स्थान पटकावले आहे. यामध्ये अहिल्यानगर येथील महावीर मल्लखांब व योगा प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थींनी दिया राजेंद्र जासूद (Diya Jasud) हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या कामगिरीबद्दल आय लव्ह नगर व रसिक ग्रुपच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, प्रा. मेधा काळे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार
महाराष्ट्राच्या संघाने १७ पदकांसह पटकावले पहिले स्थान
दरम्यान ही स्पर्धा योगासन स्पोर्टस् प्रमोशन कमिटी, यागासन भारत, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय संस्थांतर्फे मोरारजी देसाई आंतरराष्ट्रीय योगा संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे २६ ते २८ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. पहिल्या पॅरा नॅशनल योग चॅम्पियनशिपच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने १७ पदकांसह पहिले स्थान पटकावले आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती
दिया म्हणाली, (Para National Yogasana Championship)
मला माझ्या पालकांना आणि प्रशिक्षक उमेश झोटींग यांना संपूर्ण श्रेय द्यायचे आहे. मी अहिल्यानगर पंचायत समितीत काम करते, त्यामुळे जास्त वेळ सरावासाठी मिळत नव्हता, त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात वेळ देता आला नाही म्हणून पालकांनी माझ्यासाठी विशेष प्रशिक्षकाची नेमणूक केली, त्या म्हणजे कीर्ती घोडके, त्यांनी मला वेळोवेळी योगासनातील बारकाव्यांचे धडे दिले. तिचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, योगासनेचे संजय मालपाणी, प्रशिक्षक उमेश झोटींग आदींनी अभिनंदन केले आहे.


