न्यू आर्ट्स महाविद्यालयात उपकुलगुरू व विद्यार्थी संवाद
Parag Kalkar : नगर : आज स्पर्धेच्या युगात आपण फक्त पास होण्यासाठी शिकत आहोत. तुम्ही फक्त पास होण्यासाठी शिकू नका, तुम्हाला १०० टक्के मार्क पडले अन फिल्डवर तुम्हाला काही आले नाही, तर त्या शिकण्याला काही उपयोग नाही. तुमचं नॉलेज जो पर्यंत ऍक्शनमध्ये येत नाही, तो पर्यत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. स्वतः च व्यक्तिमत्व साध्य कारण्यासाठी महाविद्यालय ही विद्यार्थ्यांची कार्यशाळा आहे. त्यामुळे हे तीन चार वर्ष जास्तीत जास्त अधिकचे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) उप कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर (Parag Kalkar) यांनी केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (New Arts Commerce and Science College) आयोजित बी. बी. ए. व बी. बी. ए (आयबी) यांच्या संयुक्त विद्यमाने उपकुलगुरू व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नक्की वाचा : ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशोब होणार’-बजरंग सोनवणे
डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
महाविद्यालयाच्या राजमाता सेमिनार हॉलमध्ये उप कुलगुरू प्रा. डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सागडे, वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यास मंडळाचे डॉ. मंगेश वाघमारे, डॉ. संजय कळमकर आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर
डॉ. काळकर म्हणाले, (Parag Kalkar)
महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. त्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थीनी सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या सोबत, तसेच परिसरातील माणसे ओळखायला शिकतो. हे जर तुम्ही शिकले नाही तर तुमच्या शिक्षणाला काही महत्व नाही. आज हाजरो, लाखो विद्यार्थी महाविद्यालय, तसेच विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यांना सर्वाना नोकरी मिळते का? तर नाही. कारण त्यांच्यात वक्तृत्व तसेच नेतृत्व करण्याची हिंमत नसते. त्यामुळे स्वतः च व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी महाविद्यालय ही विद्यार्थ्यांची कार्यशाळा आहे. या कार्यशाळेचा अधिकाधिक फायदा विद्यार्थीनी घ्यावा, असे ही त्यांनी म्हटले आहे. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने उप कुलगुरू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.