Parag Milk Price:महागाईची झळ दुधालाही;अमूल,मदरनंतर आता पराग दुधाचे दर ही वाढले

काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात वाढ (Milk Rate Increse) करण्यात आली होती. या दोन्ही नंतर आता परागनेही दुधाच्या दरात (Parag Milk Price) वाढ केली आहे.

0
Parag Milk Price:महागाईची झळ दुधालाही;अमूल, मदरनंतर आता पराग दुधाचे दर ही वाढले
Parag Milk Price:महागाईची झळ दुधालाही;अमूल, मदरनंतर आता पराग दुधाचे दर ही वाढले

नगर : सध्या देशातील सामान्य नागरिक महागाईने (Inflation) होरपळल्याचे चित्र दिसत आहे. या महागाईचा परिणाम आता दुधावरही दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात वाढ (Milk Rate Increse) करण्यात आली होती. या दोन्ही नंतर आता परागनेही दुधाच्या दरात (Parag Milk Price) वाढ केली आहे. परागने दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं पराग दुधाची किंमत आता प्रतिलिटर ६६ रुपयांवरुन ६८ रुपयांवर गेली आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

एका बाजूला दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजुला विविध दुध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करताना दिसत आहे.परागच्या दोन्ही एक लिटर व्हरायटी पॅकमध्ये प्रत्येकी २ रुपयांनी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पराग दुधाचे नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत.

परागच्या दुधाला दर किती? (Parag Milk Price)

पराग डेअरीचे जीएम, विकास बालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, परागच्या एक लिटरच्या दोन्ही पॅकच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, अर्धा लिटर पॅकमध्ये प्रत्येकी एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं पराग गोल्ड अर्धा लिटरची किंमत ३३ रुपयांवरुन ३४ रुपयांपर्यंत वाढली आहे. अर्धा लिटर पराग मानक दुध आता ३० रुपयांऐवजी ३१ रुपयांना झाले आहे. याशिवाय अर्धा लिटर टोन्ड दुधाचा दर २७ रुपयांऐवजी२८ रुपये झाला आहे. दोन जून रोजी अमूल आणि इतर दूध उत्पादक कंपन्यांनी दरात वाढ केली होती. त्यानंतर आता परागनेही आपल्या दुधाच्या दरात वाढ केली. एका बाजुला अतिउष्णतेमुळे दुधाचे उत्पादनही कमी होत आहे. तर दुसरीकडे आता दुधाच्या दरात वाढ झाली आहे. पराग दूध दररोज सुमारे ३३ हजार लिटर दुधाचा पुरवठा करत आहे.

अवश्य वाचा : नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

अमूल आणि पराग दुधाचे दर किती ? (Parag Milk Price)

अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी मदर डेअरीनेही दुधाचे दर ही वाढवण्यात आले होते. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. यापूर्वी २०२३ च्या एप्रिल महिन्यात देखील अमूलने गुजरातमध्ये दुधाचे दर वाढवले होते. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने राज्यभरात अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे हे दर वाढवण्यात आले असल्याची माहिती अमूलने दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here