Parbhani : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने ; परभणी घटनेचा केला निषेध

Parbhani : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने ; परभणी घटनेचा केला निषेध

0
Parbhani : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने ; परभणी घटनेचा केला निषेध
Parbhani : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने ; परभणी घटनेचा केला निषेध

Parbhani : नगर : परभणी (Parbhani) येथे घडलेल्या संविधान (Constitution) शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून विटंबना विरोधात आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाज बांधवांवर प्रशासनाने केलेल्या अन्यायग्रस्त कारवाई विरोधात व दडपशाही संदर्भात जिल्हाधिकारी यांना आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत

समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, अमित काळे, योगेश थोरात, डी.आर.जाधव, सागर ठोकळ, नितीन कसबेकर, विशाल भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे, सुरेशराव भिंगारदिवे, वैभव जाधव, नवीन भिंगारदिवे, प्रकाश कांबळे, जीवन कांबळे, सिद्धांत कांबळे, गौतम वाघमारे, अनंत लोखंडे, सदाशिव भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, पंकज लोखंडे, सचिन जमदाडे, विजय जाधव, अमोल काळे, आदित्य भिंगारदिवे, येशुदास वाघमारे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : शिवाजी कर्डिलेंना ‘२०२४ बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर’ पुरस्कार

सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी (Parbhani)

पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच सीआरपीसी अन्वे या प्रकरणाची चौकशी करावी व न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत न करता न्यायाधीशामार्फत करण्यात यावे व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.