Parbhani : परभणी घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद

Parbhani : परभणी घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद

0
Parbhani : परभणी घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद
Parbhani : परभणी घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद

Parbhani : कर्जत : परभणी (Parbhani) शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या (Constitution) प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.१७) कर्जत शहरात कडकडीत बंद (Closed) पाळण्यात आला. यावेळी आरपीआयच्यावतीने सकाळी ११ वाजता शहरातून निषेध मोर्चा काढून तालुका प्रशासनास निवेदन देण्यात आले. कर्जत बंदला व्यापारी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध

परभणीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण

पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी शहरात जातीयवादी समाजकंटकांनी जातिद्वेष भावनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड केली. सदरची घटना अत्यंत लाजिरवाणी, निषेधार्थ आणि देशद्रोही आहे. या घटनेने महाराष्ट्र आणि विशेषता परभणीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने मुख्य आरोपींना पकडण्याचे सोडत कोम्बिंग ऑपरेशन करून निरपराध भीमसैनिकांना अटक केली. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे.

Parbhani : परभणी घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद
Parbhani : परभणी घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद

अवश्य वाचा : शहरातील ९० हजार मालमत्तांवर लावले ‘क्यूआर कोड’; अहिल्यानगर महापालिकेचा उपक्रम

समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी (Parbhani)

वास्तविक पाहता प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे तसेच संविधानाची शिल्पाची तोडफोड करुन अपमान करणाऱ्यां सर्व हल्लेखोर समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करावी. यासह भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार अधिकारी वर्गावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. यासह सूर्यवंशी यांच्या कुटुंबास शासकीय मदत घोषित करून कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी आरपीआयच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आंबेडकर चौक अक्काबाई नगर ते तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत प्रशासनास निवेदन देण्यात आले. मंगळवारी सकाळपासून कर्जत शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवत आरपीआयच्या कर्जत बंदला सकारात्मक प्रतिसाद दिला.