Parbhani : राहुरी : परभणी (Parbhani) येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील बंद (Maharashtra Bandh) आवाहनाला राहुरीत (Rahuri) चांगला प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला मात्र, गालबोट लागले. राहुरी शहरातील नवीपेठ येथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केली. मात्र, आयोजक आंदोलकांनी या तोडफोडी बद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने या वादावर पडदा पडला. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त करण्यासाठी सहकार्य राहील – संग्राम जगताप
आरपीआयतर्फे राहुरी शहरात बंदचे आवाहन करून निषेध
परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज (ता. १८) आरपीआयतर्फे राहुरी शहरात बंदचे आवाहन करून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या दरम्यान आरपीआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानकपासून मूक मोर्चाला सुरुवात केली. शहरातील नवीपेठ, पृथ्वी काॅर्नर, आडवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनीचौक येथे निषेध सभा घेतली. नंतर मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानककडे जात असताना नवीपेठ येथील दोन दुकान चालू होते.
अवश्य वाचा : महानगरपालिकेच्या १०० बेडच्या अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
आंदोलकांनी उघड्या दोन दुकानांवर हल्ला करत तोडफोड (Parbhani)
यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली. मात्र, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, सुनील चांदणे, बाळासाहेब जाधव, सागर साळवे, निलेश शिरसाठ, अरुण साळवे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, सूर्यकांत भुजाडी, सुनील सुराणा, संजीव उदावंत आदींसह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आला. दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजार बंद दिसून आली. बंद काळात पूर्णपणे व्यापारी पेठ बंद होती. दुपारी बारापर्यंतच दूकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. नंतर व्यवहार सुरळीत झाले.