Parivartan Mahashakti : महायुती व महाविकास आघाडीविरुद्ध तिसरी आघाडी लढणार १५० जागा

Parivartan Mahashakti : महायुती व महाविकास आघाडीविरुद्ध तिसरी आघाडी लढणार १५० जागा

0
Parivartan Mahashakti : महायुती व महाविकास आघाडीविरुद्ध तिसरी आघाडी लढणार १५० जागा
Parivartan Mahashakti : महायुती व महाविकास आघाडीविरुद्ध तिसरी आघाडी लढणार १५० जागा

Parivartan Mahashakti : नगर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असो की देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची परिवर्तन महाशक्तीची (Parivartan Mahashakti) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) उपस्थित होते.

नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक

बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. या बैठकीत १५० जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे

जरांगे व जानकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न (Parivartan Mahashakti)

दरम्यान, मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.