Parliament : राळेगणसिद्धी येथील शिक्षकांनी केला संसदेचा अभ्यास दौरा

Parliament : राळेगणसिद्धी येथील शिक्षकांनी केला संसदेचा अभ्यास दौरा

0
Parliament : राळेगणसिद्धी येथील शिक्षकांनी केला संसदेचा अभ्यास दौरा
Parliament : राळेगणसिद्धी येथील शिक्षकांनी केला संसदेचा अभ्यास दौरा

Parliament : पारनेर : देशातील लोकशाही (Democracy) प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि संसदीय (Parliament) कार्यप्रणाली कशी चालते हे समजून घेण्यासाठी राळेगणसिद्धी येथील एकनाथ भालेकर व शरद मापारी या दोन शिक्षकांनी भारतीय संसदेचा नवी दिल्ली (New Delhi) येथे जाऊन अभ्यास केला. राळेगणसिद्धीचे सुपुत्र व सध्या नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या (Government of India) अर्थ मंत्रालयात सह संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ. गणेश पोटे यांच्या विशेष सहकार्यातून व मार्गदर्शनातून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नक्की वाचा : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक

संसदेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली

यावेळी त्यांनी संसदेच्या कामकाजाची माहिती, संसदीय प्रक्रिया, विधेयकांचे सादरीकरण आणि चर्चा कशी होती याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच भारतीय लोकशाही व्यवस्थेतील संसदचे महत्त्व व इतिहास, लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे, संसदीय ग्रंथालय, सेंट्रल हॉल, जुने संसद भवन आणि संसद संग्रहालय यांना भेट देऊन ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केला. संसदेतील मार्गदर्शकांनी त्यांना कायदे कसे तयार होतात, संसदेतील प्रश्नोत्तरांचा तास आणि समित्यांचे कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली.  

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री

दिल्लीतील सरकारी शाळा आदी ठिकाणांना दिली भेट (Parliament)

यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांना संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, प्रधानमंत्री संग्रहालय, लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक, परमवीर मेमोरियल, महाराष्ट्र सदन, राजघाट, राष्ट्रीय गांधी संग्रहालय, कुतुब मिनार, लोटस टेम्पल, अक्षरधाम मंदिर, गुरुद्वारा बंगला साहिब, हुमायूं का मकबरा, जामा मज्जिद, दिल्लीतील सरकारी शाळा आदी ठिकाणांना भेट दिली. हा अभ्यास दौरा आमच्यासाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक त्याचबरोबर संसदेच्या कार्यपद्धतीबद्दल आमचे आकलन वाढवणारा होता. दिल्लीतील ऐतिहासिक वारसा, परंपरा आणि आधुनिक भारताच्या प्रगतीचा आढावा घेता आला, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या अभ्यास दौऱ्यासाठी खासदार निलेश लंके, राष्ट्रपती भवन कार्यालयाचे स्क्वाडन लीडर अंकुर नाईक, संसदीय कार्य राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव धीरज सोनजे, संसद सुरक्षा सहायक कमांडट प्रशांत कारंडे, अक्षय पांगरीकर आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.