Parner City : पारनेर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

Parner City : पारनेर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

0
Parner City

Parner City : पारनेर : पारनेर शहरातील (Parner City) बसस्थानक परिसर, राहुल नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश द्वार, संभाजी नगर, व शहरातील बहुतांश प्रभागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. नगर पंचायत (Nagar Panchayat) प्रशासनाने या मोकाट भटक्या कुत्र्यांचा (Street Dogs) बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

वाहन चालक गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढले

सविस्तर माहिती अशी की, पारनेर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, राहुल नगर, बाजारतळ, जामगाव रस्ता या परिसरात हे भटकी कुत्रे झुंडीने फिरत आहेत. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका आहे. यातील काही कुत्रे रस्त्यावरून प्रवास करणारे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावत असल्याने वाहनधारकांची त्रेधा उडत आहे. त्यांच्या भीतीने बहुतांश वाहन चालक गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अवश्य वाचा : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी (Parner City)

परिसरातील मोकाट भटक्या कुत्रे वृद्ध व्यक्ती, लहान मुले व स्रीयांना लक्ष करत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या परिसरातील उकिरड्यावर नागरीक शिळे अन्न टाकत असल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आहे. पारनेर नगर पंचायत प्रशासनाने कुत्रे पकडणाऱ्या कंपनीला कंत्राट देउन या परिसरातील भट्क्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

भटक्या कुत्र्यांवर उपयोजना हि क्लिष्ट आणि खर्चिक बाब आहे. परंतु समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • विनय शिपाई, मुख्याधिकारी, नगर पंचायत, पारनेर

पारनेर शहरातील भटके कुत्रे पकडण्याचे काल पासूनच सुरु करण्यात आले आहे. बसस्थानक चौकातील चार ते पाच भटके कुत्रे पकडण्यात आले आहे. अजूनही दोन तिन दिवसामध्ये भटके कुत्रे पकडण्यात येईल.

  • योगेश मते, नगरसेवक

मी काल बाजारात भाजी पाला आणण्यासाठी गेलो असता कमीत कमी वीस ते पंचवीस मोकाट कुत्र्यांचा कळप दिसून आला. या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे जरुरीचे आहे.

  • श्याम जाधव, नागरिक, पारनेर