Parth Pawar:पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले मी… 

0
Parth Pawar: पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले मी... 
Parth Pawar: पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले मी... 

नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप (Land Scam Allegations) करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील (Pune) महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्रात थंडीची चाहूल! हवामान विभागाचा अंदाज काय ?  

‘मी कोणताही घोटाळा केलेला नाही’ (Parth Pawar)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आरोपांची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी केली जाईल. कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणावर टीकेची झोड उठल्यानंतर पार्थ पवार यांची भूमिका समोर आली आहे. मी कोणताही घोटाळा केलेला नाही,असे पार्थ पवार म्हणाले आहेत.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन   

नेमके प्रकरण काय आहे? (Parth Pawar)

समोर आलेले हे प्रकरण पुण्यातील जमिनीचे असून पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेली ही जमीन महार वतनाची आहे. या जमिनीची किंमत सध्याच्या बाजारमूल्यानुसार १८००कोटी रुपये आहे. ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे,असा आरोप आहे. विशेष म्हणजे १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींमध्ये खरेदी केली असून त्यासाठी फक्त ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरलेले आहे, असाही दावा करण्यात आला आहे.

यासह मुळ मालकांना विश्वासात न घेता, सातबारा क्लिअर न करता हा सर्व व्यवहार झाला आहे,असाही आरोप करण्यात आला आहे. पार्थ पवार यांनी ही जमीन मुळ मालकांना परत करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु पार्थ पवार यांनी मात्र या आरोपांप्रकरणी त्यांचे मत मांडले आहे.