Password Reading Campaign : नगर : जिल्हा परिषद अहिल्यानगर (Zilla Parishad Ahilyanagar) व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shanti Kumarji Firodia Memorial Foundation) आणि युनिक फीचर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ‘पासवर्ड वाचन अभियान’ (Password Reading Campaign) कार्यक्रमात आशा एज्युकेशन फाउंडेशन (Asha Education Foundation) संचलित जय बजरंग प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर येथे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.
हे वाचा – अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारी म्हणाले की
यावेळी बोलताना भंडारी म्हणाले की, आजच्या युगात विद्यार्थी मोबाईलवर रिल्स, गेम्स आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये अधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत युनिक फीचर्स, पुणे यांनी सुरू केलेले ‘पासवर्ड वाचन अभियान’ विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांनी स्वतःच्या अनुभवातून समृद्ध वाचनामुळे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कशी मदत होते हेही स्पष्ट केले. तसेच *शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे अहिल्यानगर शहरातील विविध सामाजिक कार्यक्रमासाठी ,उपक्रमासाठी आजतागायत दिलेल्या सहकार्याबद्दल आणि योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त केले.
अवश्य वाचा – इंग्लंडला नमवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश
संस्थेकडून नेहमीच सहकार्य (Password Reading Campaign)
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या उपक्रमाचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी संस्थेकडून नेहमीच सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अहिल्यानगर (प्राथमिक विभाग) चे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनीही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी निवडलेल्या शाळांना वेळोवेळी भेट देऊन गुणवत्तावाढीसाठी युनिक फीचर्स संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
वाचन हा यशाचा गुपित मार्ग
कार्यक्रमात युनिक फीचर्सचे आनंद अवधानी यांनी आपले मनोगत व्यक्त करत पासवर्ड वाचन अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. तसेच त्यांनी आपल्या सोबतच्या सहकारी कलाकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘वाचन हा यशाचा गुपित मार्ग म्हणजे – पासवर्ड वाचन’ हा संदेश समजावून सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या संगीता पाठक यांनी केले. सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार तपोवन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षा कुसकर यांनी मानले.
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
या कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, सहव्यवस्थापक अमोल तोडकर, विस्तार अधिकारी कोलते मॅडम,विस्तार अधिकारी शिंदे, युनिक फीचर्सच्या जोगळेकर मॅडम , वसुधा बोरकर मॅडम, विषयतज्ञ शिंदे सर, राजेंद्र चव्हाण सर, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



