Pathardi | पाथर्डी : पाथर्डीतील (Pathardi) राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या जुन्या बस स्थानक परिसरातील शतकाहून जुना सैनिक (Soldier) स्मृती स्तंभ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जमीनदोस्त झाला. या ऐतिहासिक दगडी स्तंभावर गेले काही वर्षे पुनर्वसनासाठी चर्चा सुरू असताना प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. परिणामी, हा ऐतिहासिक वारसा आज अस्तित्वहीन झाला आहे.
अवश्य वाचा – वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचे पलायन; वांगदरी ग्रामस्थांचा आरोप
पहिल्या महायुद्धात शहीद स्मारक (Pathardi)
ब्रिटिश कालखंडात १९१४ ते १९१९ या पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या मित्र राष्ट्रांच्या सैनिकांच्या सन्मानार्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता. पाथर्डीचे तत्कालीन शेवगाव तालुक्याशी संलग्न असलेले भौगोलिक स्थान लक्षात घेतल्यास, या स्तंभावर स्थानिक सैनिकांचा उल्लेख नव्हता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी थेट संबंध नसल्यानेही या स्मृती स्तंभावर फारशी ऐतिहासिक संवेदना जपली गेली नव्हती.
नक्की वाचा : भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार
प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट (Pathardi)
अपघातानंतर सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांनी तुटलेल्या स्तंभाचे अवशेष पाहून प्रशासनाला माहिती दिली. महसूल विभाग, सैनिक कल्याण मंडळ, नगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील क्षेत्राधिकाराच्या वादामुळे दिवसभरात कोणतीही अधिकृत कारवाई किंवा तक्रार दाखल झाली नव्हती. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने स्तंभाचे अवशेष सुरक्षित स्थळी हलवले.