Pathardi : पाथर्डी तालुक्याचा निवडणूक आराखडा जाहीर; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रारूप गणवाटप स्पष्ट

Pathardi : पाथर्डी तालुक्याचा निवडणूक आराखडा जाहीर; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रारूप गणवाटप स्पष्ट

0
Pathardi : पाथर्डी तालुक्याचा निवडणूक आराखडा जाहीर; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रारूप गणवाटप स्पष्ट
Pathardi : पाथर्डी तालुक्याचा निवडणूक आराखडा जाहीर; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रारूप गणवाटप स्पष्ट

Pathardi : पाथर्डी: पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर प्रारूप निवडणूक आराखडा जाहीर करण्यात आला. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तयार झालेल्या या आराखड्यामध्ये एकूण लोकसंख्या, ग्रामपंचायती, गावे तसेच अनुसूचित जाती व जमातींची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

नक्की वाचा : तळेगाव निमोण परिसराला पाणी देणार : आमदार खताळ

प्रशासनाकडून गट व गणरचना सुनिश्चित

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी प्रशासनाकडून गट, गणरचना सुनिश्चित करण्यात आली आहे. पंचायत समितीचे  एकूण १०  गण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये १०८ ग्रामपंचायती आणि १३४ गावे समाविष्ट असून, एकूण लोकसंख्या २.३० लाखांहून अधिक आहे. प्रत्येक गणात लोकसंख्या, गावे आणि ग्रामपंचायती यांचा समतोल राखण्यात आला आहे. सर्वाधिक लोकसंख्या टाकळी मानूर गणात असून सर्वात कमी माणिकदौंडी गणात नोंदविण्यात आली आहे. अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या देखील प्रत्येक गणात स्वतंत्रपणे नमूद करण्यात आली आहे.या गणरचनेत कासार पिंपळगाव, कोरडगाव, भालगाव, अकोला, माळीबाभुळगाव, तिसगाव, मिरी, करंजी, माणिकदौंडी आणि टाकळी मानूर हे १० गण समाविष्ट आहेत. प्रत्येक गणात ९ ते १३ ग्रामपंचायती व ११ ते १६ गावे समाविष्ट करण्यात आली असून, लोकसंख्येचा सरासरी स्तर राखण्यात आलेला आहे. 

अवश्य वाचा : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २६ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पाथर्डी तालुक्याचे एकूण ५ गट निश्चित (Pathardi)

पाथर्डी तालुक्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण ५ गट निश्चित करण्यात आले असून, त्यामध्येही १०८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गटात कासार पिंपळगाव, भालगाव, तिसगाव, मिरी व टाकळी मानूर या पाच विभागांचा समावेश असून, सर्व गटांमध्ये सुमारे ४५ ते ४७ हजार लोकसंख्या नोंदविण्यात आली आहे.


अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसंख्येचा विचार करता, तिसगाव व कासार पिंपळगाव विभागांत सर्वाधिक अनुसूचित लोकसंख्या आहे. प्रत्येक गटात १८ ते २४ ग्रामपंचायतींचा समावेश असून, २४ ते ३० या दरम्यान गावे आहेत. हे विभाजन लोकसंख्या व भौगोलिक समीकरणे विचारात घेऊन निश्चित करण्यात आले आहे.

एकूण ग्रामपंचायती : १०८,गावे : १३४,एकूण लोकसंख्या : २,३०,८९८,अनुसूचित जाती : २२,६०१,अनुसूचित जमाती : ३,९०० यामध्ये लोकसंख्या आहे.

प्रस्तावित गट व गणरचनेवर नागरिकांकडून २१  जुलै अखेरपर्यंत हरकती मागवण्यात आले आहेत.

गट व गण रचनेचा प्रारूप आराखडा पुढील प्रमाणे: – कासार पिंपळगाव गट, गण:- कासार पिंपळगाव, पाडळी, डांगेवाडी, चितळी, सुसरे, सोमठाणे नलावडे, सोमठाणे बु, साकेगांव, काळेगाव फकीर, सांगवी बु, सांगवी खु, माळेगांव, खेर्डे, ढवळेवाडी. कोरडगांव गण :- कोरडगाव,औरंगपुर, पागोरी पिंपळगांव, प्रभुपिंप्री, जिरेवाडी, निपाणी जळगांव, वसु, सोनोशी, तोंडोळी, कोळसांगवी, कळसपिंप्री, दुलेचांदगाव, वाळुंज, आगसखांड.

भालगांव गट, गण: भालगांव,कासाळवाडी, खरवंडी कासार, मुंगूसवाडे, मालेवाडी, एकनाथवाडी, मिडसांगवी, भवरवाडी, जवळवाडी, ढाकणवाडी, भारजवाडी.अकोला गण :- अकोला पालवेवाडी, धायतडकवाडी, शेकटे, मोहोजदेवढे, हाकेवाडी, काळेवाडी, रुपनरवाडी, भुतेटाकळी, नांदुर निंबादैत्य, कारेगांव, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिंपळगव्हाण, जांभळी.

 तिसगांव गट व गण:- तिसगाव,सोमठाणे खु, मोहोज बु, मोहोज खु, कडगांव, राघोहिवरे, खांडगाव, जोहारवाडी, कौडगांव आठरे, निंबोडी, त्रिभुवनवाडी, मांडवे, देवराई, पारेवाडी.माळी बाभुळगांव गण: माळी बाभूळगाव, हत्राळ, सैदापुर, मढी, घाटशिरस, शिरापुर, करडवाडी, निवडुंगे, रांजणी, धामणगाव, केळवंडी.

मिरी गट व गण:- मिरी,रेणुकाईवाडी, शंकरवाडी, आडगांव, जवखेडे दुमाला, जवखेडे खालसा, कासारवाडी, हनुमान टाकळी, कामत शिंगवे, कोपरे, शिंगवे केशव.करंजी गण:- करंजी,डोंगरवाडी, डमाळवाडी, लोहसर, शिराळ, चिचोंडी, गितेवाडी, दगडवाडी, धारवाडी, वैजुबाभुळगांव, भोसे, कोल्हार, सातवड.

टाकळी मानुर गट व गण:- टाकळी मानुर,चुंभळी, अंबिकानगर, चिंचपुर पांगुळ, मानेवाडी, चिंचपुर इजदे, कुत्तरवाडी, भिलवडे, पिंपळगांव टप्पा, तिनखडी, जोगेवाडी, वडगांव, ढाकणवाडी, करोडी.


माणिकदौंडी गण:-माणिकदौंडी,पत्र्याचा तांडा, मोहरी, घुमटवाडी, लांडकवाडी, पिरेवाडी, डमाळवाडी, शिरसाठवाडी, चितळवाडी, आल्हणवाडी, जाटदेवळे, शिंदेवाडी, बोरसेवाडी, धनगरवाडी, चेकेवाडी, मोहटे.