Pathardi News : पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात बेडचा तुटवडा

पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध व्हावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

0
पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात बेडचा तुटवडा

पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयात (Pathardi Hospital) शंभर बेडची सुविधा (Bed facilities) उपलब्ध व्हावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका असुन लोकसंख्या जवळपास दोन लाख आहे. ग्रामीण भागाचा विचार करता डोंगर दऱ्यात असलेल्या या तालुक्यात वैद्यकीय अद्ययावत सोई सुविधांचा अभाव आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय हे पाथर्डी शहराच्या ठिकाणी आहे. मात्र शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अतिशय कमी बेड आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार घेणे हे फार कठीण झाले आहे. या तुडवड्यामुळे  बऱ्याच रुग्णांना आरोग्य सेवांपासून वंचित राहून आर्थिक बोजा सोसावा लागत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने टोकडी आरोग्य सेवा असून परिपूर्ण आरोग्य सेवेसाठी वाढीव बेडच्या सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

नक्की वाचा : आयसीसीचा नवा नियम ; गोलंदाजांनाही ‘टाईमआउट’

पाथर्डी तालुका हा मोहटादेवी, मढी, वृध्देश्वर, भगवानगड, कानिफनाथ मढी या तिर्थक्षेत्रांना संलग्न असून राज्यातून लाखो भाविक येथे येत असतात. तिर्थक्षेत्रात येणा-या भाविकांना उपचारासाठी वैद्यकीय सेवा मुबलक प्रमाणात मिळत नसून जवळपास उपजिल्हा रुग्णालयाचे अंदाजे साडेपाच एकर क्षेत्र असून कित्येक वर्षापासून आंदोलन करून रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले आहे.

हेही वाचा :  व्हॉट्सॲप युजर्ससाठी नवीन फिचर येणार

जनतेला चांगल्या सुविधांसह शंभर बेडची तरतुद व्हावी,अशी वारंवार मागणी जिल्हाधिकारी, वैद्यकीय उपसंचालक, आरोग्य मंत्रालय यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे.  तालुक्यातील वैद्यकिय सुविधांची गरज लक्षात घेवुन उपजिल्हा रुग्णालयास शंभर बेडची तरतुद शासन दरबारी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here