Pathardi Municipal Council : पाथर्डी: पाथर्डी नगरपरिषद (Pathardi Municipal Council) निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १४ उमेदवारांनी माघार घेतली. यात २ नगराध्यक्ष (Mayor Post) पदाचे तर १२ नगरसेवक पदाचे उमेदवारांचा समावेश असून यामुळे संपूर्ण निवडणूक (Election) समीकरणच बदलले आहे. विशेष म्हणजे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) (Shiv Sena UBT) आता पूर्णपणे रिंगणाबाहेर गेली असून त्यांच्या दोन्ही उमेदवारांच्या माघारीमुळे हा पक्ष निवडणुकीतून बाद झाला आहे.
अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
अपक्ष उमेदवारीने भाजपची चिंता वाढली
शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोमनाथ बोरुडे व नगरसेवक पदाच्या मनीषा बोरुडे यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकही उमेदवार रिंगणात उरला नाही. दरम्यान, भाजपला डोकेदुखी ठरणाऱ्या प्रभाग १अ मधील संगीता सोनटक्के यांनीही उमेदवारी मागे घेतली असून यामुळे त्या प्रभागातील भाजपची अडचण कमी झाली आहे. मात्र प्रभाग ५अ मधून माजी नगरसेविका दिपाली बंग यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपची चिंता वाढली आहे.
नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर
नगराध्यक्ष पदाचा वाद न्यायालयात (Pathardi Municipal Council)
नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्ष पदाच्या एकाच जागेसाठी ५ उमेदवार उभे आहेत. परंतु नगराध्यक्ष पदाचा वाद न्यायालयात गेल्याने अंतिम चित्र २५ नोव्हेंबरला न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून तिरंगी लढत अटळ असल्याचे राजकीय परीस्थितीतून स्पष्ट होते.



