Pathardi Police Station : पाथर्डी : येथील पोलीस ठाण्याच्या (Pathardi Police Station) आवारात गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्यांमध्ये जप्त (Seized) करण्यात आलेली तसेच अपघातग्रस्त व बेवारस अवस्थेत सापडलेल्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर पडून आहेत. या वाहनांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याने संबंधित वाहनमालकांनी तत्काळ ती ताब्यात घ्यावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी (Vilas Pujari) यांनी केले आहे.
नक्की वाचा : सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; ‘असा’ असणार अंत्ययात्रेचा मार्ग

मोठ्या प्रमाणावर वाहनांचा साठा
पोलीस प्रशासनाकडून यापूर्वीही अनेकदा वाहनधारकांना कळविण्यात आले होते. मात्र, अद्यापही अनेकांनी आपली वाहने पोलीस ठाण्यातून नेलेली नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वाहनांचा साठा निर्माण झाला असून, त्यांची देखभाल करणे कठीण बनले आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन (Pathardi Police Station)
याबाबत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी स्पष्ट केले की, संबंधित वाहनमालकांनी येत्या आठ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात हजर राहून आपली वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा, या वाहनांबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आवाहन करत वाहनधारकांनी तातडीने प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.



