Pavan Naik : नगरचे पवन नाईक झळकणार दूरदर्शनवर

Pavan Naik : नगरचे पवन नाईक झळकणार दूरदर्शनवर

0
Pavan Naik : नगरचे पवन नाईक झळकणार दूरदर्शनवर
Pavan Naik : नगरचे पवन नाईक झळकणार दूरदर्शनवर

Pavan Naik : नगर : दूरदर्शनवर (Doordarshan) खास संगीत कलाकारांसाठी विशेष कार्यक्रम प्रसारित होत असतात. अहिल्यानगरचे प्रसिद्ध सुफी गायक पवन श्रीकांत नाईक (Pavan Naik) व त्यांचा वाद्यवृंद हा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर (DD Sahyadri) आपली कला सादर करणार आहेत.

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री साहेब,आरोपींना पाठीशी घालू नका,अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”- मनोज जरांगे

पवन नाईक यांचा संपूर्ण वाद्यवृंदही सहभागी होणार (Pavan Naik)

सह्याद्री वाहिनीवरील खास कलाकारांसाठी प्रख्यात असलेल्या ‘मैत्र हे शब्द सुरांचे’ या कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमात कलावंता विषयी माहिती देऊन त्याला त्याची कला सादर करावी लागते. यावेळी पवन नाईक यांची मुलाखत विख्यात मुलाखतकार विघ्नेश जोशी हे घेणार आहेत. यामध्ये पवन नाईक त्यांच्यासह त्यांचा संपूर्ण वाद्यवृंदही सहभागी होणार आहे. यामध्ये निर्माती – उमा दिक्षित, ऋतुजा पाठक व नेहा दरवडे या हार्मोनियम, कुलदीप चव्हाण हे बेंजो, शेखर दरवडे तबला वादन करार आहेत. तर नवरतन वर्मा, पवन तळेकर, श्रेयस शित्रे, मूलाशू परदेशी हे सहगायक म्हणून साथ संगत देणार आहेत.

नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय  

मुलाखतीचे प्रसारण २९ डिसेंबरला होणार (Pavan Naik)

पवन नाईक यांच्या सुमधूर संगीत मैफिलीचे व मुलाखतीचे प्रसारण २९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८:३० वाजता होणार आहे. तसेच पुन:प्रसारण ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता व संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. तरी संपूर्ण नगरकरांनी त्यांच्या या कार्यक्रमाचे प्रसारण अवश्य पहावे व आपल्या मातीतील कलाकाराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.