Pay and Park : एमजी रोड कापड बाजारात ‘पे अँड पार्क’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

Pay and Park : एमजी रोड कापड बाजारात ‘पे अँड पार्क’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

0
Pay and Park : एमजी रोड कापड बाजारात ‘पे अँड पार्क’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
Pay and Park : एमजी रोड कापड बाजारात ‘पे अँड पार्क’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यानंतरही शुल्क आकारणी अन्यायकारक; दुकाने बंद ठेवून आंदोलनाचा इशारा

Pay and Park : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत (Ahilyanagar Municipal Corporation) शहरातील १२ रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ (Pay and Park) तसेच १२ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ (No Parking) योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेत एमजी रोड कापड बाजार या महत्त्वाच्या व्यापारी भागाचा समावेश करण्यात आल्याने येथील व्यापाऱ्यांनी तीव्र हरकत नोंदवली आहे.

अवश्य वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी दिल्या हाेत्या जागा

एमजी रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी यापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंनी सुमारे सात ते आठ फूट जागा कोणतीही नुकसानभरपाई न घेता स्वतःच्या खर्चाने इमारती तोडून दिल्याचे सांगितले. या संदर्भात शासन व महापालिकेमध्ये तडजोड झालेली असताना ‘पे अँड पार्क’ लागू करणे हे अन्यायकारक असून न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती (Pay and Park)

या बाजारपेठेत किरकोळ स्वरूपातील दुकाने असून अगदी पाच रुपयांपासून वस्तू विकल्या जातात. अशा ठिकाणी पार्किंग शुल्क आकारल्यास ग्राहक येणे कमी होईल व व्यवसायावर मोठा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. परिणामी बाजारपेठ इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता असून अनेक कामगारांच्या नोकऱ्यांवरही गदा येऊ शकते.


महापालिकेने हरकती व सूचना मागवण्यापूर्वीच खाजगी कंत्राटदाराला पत्र देऊन प्रक्रिया सुरू केल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. ही कृती पक्षपाती व बेकायदेशीर असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा आणणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.


शहरात अद्याप योग्य पार्किंगची व्यवस्था नसताना अचानक ‘पे अँड पार्क’ योजना राबवणे हे अव्यवहार्य व नियोजनशून्य असल्याची टीका करण्यात आली. तसेच एमजी रोड कापड बाजार हा शासन निर्णयानुसार ‘नो हॉकर्स झोन’ असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.

Pay and Park : एमजी रोड कापड बाजारात ‘पे अँड पार्क’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
Pay and Park : एमजी रोड कापड बाजारात ‘पे अँड पार्क’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध


योजनेत चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा समावेश असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच वाहन टोइंग केल्यास मोठा दंड व जीएसटी आकारला जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शासनाकडून आधीच रस्ता कर आकारला जात असताना त्याच रस्त्यावर पुन्हा पार्किंग शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. इतर शहरांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नसल्याचेही त्यांनी सांगितले.


एमजी रोड कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या योजनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच महापालिकेकडे अधिकृत हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

तथापि, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करून योजना जबरदस्तीने राबवण्याचा प्रयत्न केल्यास गांधीवादी मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्यामध्ये एमजी रोड कापड बाजारातील दुकाने बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले.


शहरातील नागरिक व नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा द्यावा, तसेच एमजी रोड कापड बाजाराचा ‘पे अँड पार्क’ योजनेतून तात्काळ वगळावा, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. या पत्रकार परिषदेस शामराव देडगावकर, ईश्वर बोरा, किरण व्होरा, कमलेश आहूजा, संभव काठेड, विशाख वैद्य, रुपेश नहाटा, राहुल मुथा, प्रकाश बायड, भागचंद रामसिंगानी आदी उपस्थित होते.