PBKS vs RCB: आयपीएलमधील पंजाब किंग्सचे आव्हान संपुष्टात,आरसीबीचा ६० धावांनी विजय

बंगळुरूने कोहलीच्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर २४१ धावांची मजल मारली.बंगळुरूने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १८१ धावांतच आटोपला.

0
PBKS vs RCB
PBKS vs RCB

नगर : आयपीएल २०२४ च्या (IPL 2024) रणसंग्रामात आरसीबीने (RCB) पंजाबचा ६० धावांनी दारुण पराभव केला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आले आहे. या विजयासह बंगळुरूने प्ले ऑफच्या आशा जिवंत राखल्या आहेत. विराट कोहलीची ९२ धावांची खेळी बंगळुरूच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. बंगळुरूने कोहलीच्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर २४१ धावांची मजल मारली. अशा प्रकारे बंगळुरूने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १८१ धावांतच आटोपला.

नक्की वाचा : भारतातील लोकशाही संकटात : पवार

कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर (PBKS vs RCB)

गुणतालिकेत कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा संघ १४ गुणांसह प्लेऑफसाठी संभाव्य आहे. चेन्नई, दिल्ली, लखनौ या तीन संघांचे १२ गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरण्यासाठी या तीन संघात चुरस आहे. बंगळुरूच्या संघाचे या  विजयासह १० गुण झाले आहेत. त्यांच्यासाठी प्लेऑफचा रस्ता कठीण आहे पण अशक्य नाही. मुंबई आणि पंजाबचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

अवश्य वाचा : वकिलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गजाआड

कोहलीकडून ९२ धावांची मॅरेथॉन खेळी (PBKS vs RCB)

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोहलीने सलामीवीराच्या भूमिकेत खेळताना ४७ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. रजत पाटीदारने २३ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. कॅमेरुन ग्रीनने २७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली. फिनिशरच्या भूमिकेतील दिनेश कार्तिकने ७ चेंडूत १८ धावा केल्या आणि बंगळुरूने २२५ धावांचा टप्पा ओलांडला. पंजाबकडून हर्षल पटेलने ३ तर विदवथ कावेरप्पाने २ विकेट्स पटकावल्या.

पंजाबकडून रायली रुसोच्या ६१ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रुसोने २७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावांची वेगवान खेळी केली. शशांक सिंग (३७), जॉनी बेअरस्टो (२७) यांनी चांगली सुरुवात केली.  मात्र बंगळुरू ने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने ३ तर स्वप्नील सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. या खेळात विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. बंगळुरूने या सामन्यासाठी ग्लेन मॅक्सवेलऐवजी लॉकी फर्ग्युसनला संधी दिली तर पंजाबने कागिसो रबाडा ऐवजी लायम लिव्हिंगस्टन संघात घेतलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here