नगर : आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या ‘दिल्ली चलो’ (Delhi Chalo) शेतकरी आंदोलनाने आता हिंसक वळण लागलं आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस असून या आंदोलनात आणखी एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तर हरियाणा पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत तीन पोलिसांचा मृत्यू (Police Died) झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
नक्की वाचा : आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरू आंदोलनादरम्यान, खनौरी येथे एका आंदोलकाचा मृत्यू आणि अनेक पोलीस जखमी झाल्याने बुधवारी (ता.२१) दोन दिवस आंदोलन थांबवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी पत्रकारांना सांगितले की, पुढील रणनीतीबाबत शुक्रवारी (ता.२३) संध्याकाळी निर्णय घेतला जाईल.
“शेतकरी आंदोलनातील पाचवा मृत्यू” (Farmers Protest)
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनातील हा पाचवा मृत्यू असून, दर्शन सिंह असे मृताचे नाव आहे, ते ६२ वर्षांचे होते. ते पंजाबमधील भटिंडा येथील अमरगढ गावातील रहिवासी होते. दर्शन सिंग हे १३ फेब्रुवारी २०२४ पासून ते खनौरी सीमेवर राहत होते. दर्शन सिंग यांच्या मृत्यूबाबत शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी एएनआयला माहिती दिली, ते म्हणाले, दर्शन सिंह हे शेतकरी आंदोलनातील पाचवे शहीद आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.
अवश्य वाचा : नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
२० पोलीस कर्मचारी जखमी (Farmers Protest)
अंबाला पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, १३ फेब्रुवारी २०२४ पासून शेतकरी संघटनांकडून शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या संदर्भात लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस प्रशासनावर दगडफेक करून गोंधळ घालण्याचे प्रयत्न रोज होत आहेत. या काळात सरकारी व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आंदोलनादरम्यान २० पोलीस कर्मचारी जखमी झालेत. एका पोलीस कर्मचाऱ्याला ब्रेन हॅमरेज, तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असं निवेदनात सांगण्यात आले.