Pension : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सुधारित पेन्शन मिळणार १ मार्चपासून

Pension : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सुधारित पेन्शन मिळणार १ मार्चपासून

0
Pension : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सुधारित पेन्शन मिळणार १ मार्चपासून
Pension : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सुधारित पेन्शन मिळणार १ मार्चपासून

Pension : नगर : राज्यातील सरकारी कर्चमाऱ्यांना १ मार्चापासून सुधारित पेन्शन (Pension) योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary of State) नितीन करीर यांनी दिली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर (Nitin Karir) यांची नुकतीच मंत्रालयामध्ये (Ministry) बैठक झाली. या बैठकीमध्ये नितीन करीर यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

नितीन करीर म्हणाले

”केंद्राप्रमाणे ४ टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार आहे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे. सुधारित पेन्शन योजना १ मार्च २०२४ पासून लागू होईल. त्याचे शासन आदेश देखील जारी होतील.”  ”महत्त्वाचे म्हणजे, २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या जवळपास साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना सरकारच्या सुधारित पेन्शन योजना निर्णयाचा फायदा होणार आहे,” अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.

नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

लवकरच अधिसूचना जारी केली जाणार (Pension)

त्यामुळे राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाण्याची चिन्हे आहेत. येत्या पावसाळी अधिवेशात पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here