Pensioners : १८ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

Pensioners : १८ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

0
Pensioners : १८ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन
Pensioners : १८ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक व बँक प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

Pensioners : नगर : निवृत्तीवेतनधारकांना (Pensioners) निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन (Revised Pension) तसेच इतर आनुषंगिक लाभ देण्यासंबंधी, तसेच निवृत्तीवेतनविषयक अडचणींच्या निराकरणासाठी दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, अहिल्यानगर (Zilla Parishad Ahilyanagar) येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन सहारे यांनी दिली.

हे देखील वाचा: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं

निवृत्तीवेतनधारकांनी तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन (Pensioners)

​जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक तसेच संबंधित बँकांचे प्रतिनिधी, निवृत्तीवेतनधारकांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या अदालतीस उपस्थित राहून आपल्या समस्यांचे/तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे.

अवश्य वाचा: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या त्या पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!