Petrol and Diesel : कर्जत तालुक्यात कोरोनानंतर प्रथमच झळकले इंधन संपल्याचे फलक 

0
Petrol and Diesel : कर्जत तालुक्यात कोरोनानंतर प्रथमच झळकले इंधन संपल्याचे फलक
Petrol and Diesel : कर्जत तालुक्यात कोरोनानंतर प्रथमच झळकले इंधन संपल्याचे फलक

Petrol and Diesel : कर्जत : आखाती देशातील युद्धाचे परिणाम आता भारतातील ग्रामीण भागात ही जाणवू लागले आहेत. स्वयंपाक गॅस तुटवड्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या (Petrol and Diesel) आणीबाणीने सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या अचानक उभ्या राहिलेल्या संकटाने अनेक धावत्या वाहनांनी रस्त्यातच दम तोडला. कर्जत (Karjat) तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपाचे (Petrol Pump) इंधना अभावी शटर बंद झाले आहे. कोरोनानंतर प्रथमच पंपावर इंधन संपल्याचे फलक लागले आहे. 

नक्की वाचा : धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

इंधन संपल्याची नामुष्की

 इराण-अमेरिका इस्राइल या आखाती देशाच्या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असून इंधन पुरवठा देखील बंद होणार असल्याच्या अफवेने कर्जत शहर आणि तालुक्यात वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करत क्षमतेपेक्षा जास्त इंधन भरल्याने जवळपास तालुक्यातील सर्वच पंपाचे बुधवारी (ता. २५) संध्याकाळी इंधन संपल्याची नामुष्की ओढवली. अक्षरशः लांब-लचक रांगा लावत वाहनचालकांनी पेट्रोल-डिझेल भरले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

इंधन नसल्याने पेट्रोल पंपाचे शटर बंद (Petrol and Diesel)

अचानक सुटलेल्या अफवेने कर्जत तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर हीच परिस्थिती उदभवली. काही नागरिकांनी मिळेल त्या साधनात इंधन भरत अतिरिक्त साठेबाजी केल्याने गुरुवारी (ता. २६) शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर कोरोनानंतर प्रथमच इंधन संपल्याचे फलक झळकले. अचानक उदभवलेल्या या संकटाने अनेक धावत्या वाहनांनी इंधना अभावी रस्त्यातच दम तोडल्याचे निदर्शनास आले. एकीकडे जिल्हा प्रशासन इंधन तुटवडा नसल्याचे सांगत असताना कर्जत तालुक्यातील पेट्रोल पंपाचे इंधन नसल्याने शटर बंद झाले आहे. यामुळे नागरिकांच्या प्रवासावर देखील अघोषित निर्बंध लागले आहे.  त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त साठेबाजी आणि टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक करीत आहे.