Petrol Diesel Price:मोठी बातमी!उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

0
Petrol Diesel Price:मोठी बातमी!उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?
Petrol Diesel Price:मोठी बातमी!उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

नगर : राज्यात महागाईने (Inflation) सामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. याच महागाईने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतींबाबत (Petrol Diesel Price) मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वरील उत्पादन शुल्क (Excise Duty) वाढवले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,केंद्र सरकारने आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवार (ता.८) लागू होणार आहेत. 

नक्की वाचा : मोठी बातमी! मुंबईतील वॉटर टँकर सेवा बंद होणार  

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढणार (Petrol Diesel Price)

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

अमेरिकेने आयात शुल्क लादल्याने शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. तसंच,इतर उत्पादनांवरीलही किमती वाढण्याची शक्यता आहे,असं असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने याचा परिणाम म्हणून पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमतीवर झाल्यास सामान्य नागरिकांचं बजेट हलण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासासह इतर अनेक सेवा सुविधा महाग होतील.

अवश्य वाचा : प्रवीण तरडे यांची नवी इनिंग;’बोल मराठी’ गाणे झाले प्रदर्शित

‘पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ नाही’ (Petrol Diesel Price)

या इंधनवाढीबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, “आज उत्पादन शुल्क दरात वाढ झाल्यानंतर,पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही,असं सांगितलं आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here