Petrol-diesel shortage | अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल टंचाई भासणार नाही: डॉ. स्वाधीन गाडेकर

तीन महिने पुरेल इतका साठा

0

Petrol-diesel shortage : राहाता: सध्या इराण ,इराक व अमेरिकेमध्ये युद्ध सुरू असून या युद्धामुळे देशांमध्ये पेट्रोल व डिझेलचा तुटवडा (Petrol-diesel shortage) होणार असल्याच्या बातम्या किंवा काही मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना ग्राहकाकडून विचारणा केली जात आहे की पेट्रोल, डिझेल हे पुरणार आहे की नाही. अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनच्या वतीने अशा कुठल्याही प्रकारचा तुटवडा आपल्या भागामध्ये होणार नाही, असे पेट्रोल डीलरचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.

अवश्य वाचा-  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता : सुजय विखे पाटील

तीन महिने पुरेल इतका साठा (Petrol-diesel shortage)

    कुठल्याही पेट्रोल पंपावर किमान ३ दिवस पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा  साठा केलेला असतो तसेच आपल्या देशाकडे किमान ९० दिवसाचा म्हणजे ३ महिने पुरेल इतका पेट्रोल व डिझेलचा साठा  रिफायनरी मध्ये उपलब्ध आहे तसेच आमचं पेट्रोलियम कंपन्यासोबत बोलणं होत आहे त्यावरून तरीही नगर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना अशा प्रकारचा तुटवडा आपल्या भागामध्ये होणार नाही. असे अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनच्या वतीने  जिल्हाध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.