Phaltan Women Doctor Case: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

0
Phaltan Women Doctor Case:हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
Phaltan Women Doctor Case:हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

नगर : सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटणमध्ये (Phaltan) एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Female Doctor Commits Suicide) केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. तळहातावरच लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Sucide Note) या महिलेनं एका पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप (Sexual harassment allegations) केले आहेत.

नक्की वाचा: आता इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर;नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता

प्रकरण नेमकं काय ? (Phaltan Women Doctor Case)

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी गुरुवारी (23 ऑक्टोबर) फलटणमधील एका हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने PSI गोपाळ बदने, प्रशांत बनकर, खासदार, यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यातील  पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.तसेच प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच देखील तिने लिहिलं होतं.

अवश्य वाचा: मोठी बातमी!देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र 

पिडीत महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमधे गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते. याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या. फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणच्या शासकीय रुग्णालयात घेऊन यायचे, तेव्हा पोलीसांना हवे तसे आरोपींचे वैद्यकीय अहवाल संबंधित महिला डॉक्टरकडून मिळत नसल्याने हे खटके उडत होते. याचमुळे या महिला डॉक्टरची तक्रार फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित महिला डॉक्टरची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीसमोर या महिला डॉक्टरने स्वतःची बाजू लेखी स्वरुपात मांडली होती. ज्यात पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.  

सातारा ग्रामीण पोलिसांकडून प्रशांत बनकरला अटक (Phaltan Women Doctor Case)

आता या प्रकरणात सातारा ग्रामीण पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. तर PSI गोपाळ बदने,याचा शोध सुरु आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली असून, या घटनेत जबाबदार असलेल्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावे,असे आदेश पोलिसांना दिले. आता या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचं पाहायला मिळालं  आहे.