Phir Aayi Hasseen Dillruba: तापसी पन्नूच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित’

'फिर आयी हसीन दिलरुबा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे.

0
Phir Aayi Hasseen Dillruba: तापसी पन्नूच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित'
Phir Aayi Hasseen Dillruba: तापसी पन्नूच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित'

Phir Aayi Hasseen Dillruba : अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने लोकांना जाळ्यात फसवण्यासाठी परत आली आहे. नुकताच तिच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चा ट्रेलर प्रदर्शित (Trailer Relese) झाला आहे. या ट्रेलरमध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीची (Vikrant Messi) प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे.

नक्की वाचा : पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

९ ऑगस्ट रोजी चित्रपट होणार प्रदर्शित (Phir Aayi Hasseen Dillruba)

‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाच्या माध्यमातून ट्रेलरमधून तापसीचं सौंदर्य पुन्हा प्रेक्षकांना भावलं आहे. एकदम सुंदर अशा लाल रंगाच्या साडीत विक्रांत सोबतची केमिस्ट्री ट्रेलर मधून दाखवण्यात आली आहे. आपल्या सुंदरेतून लोकांना जाळ्यात फसवण्यासाठी तापसीचा थ्रिलर ड्रामा ‘फिर आई हसीन दिलरुबा’मधून पहायला मिळणार आहे. ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी! यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीत होणार बदल

ट्रेलरमध्ये नेमके काय ? (Phir Aayi Hasseen Dillruba)


‘फिर आयी हसीन दिलरुबा’ ट्रेलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की, राणी रिशूला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असते. तर तिकडे सनी कौशलची एन्ट्री होते आणि सिनेमात एक नवाच ट्वीस्ट येतो. रिशूला मिळवण्यासाठी पागल असलेली राणी अचानकच सनीच्या प्रेमात पडते. राणीला सनीशी जवळीक साधताना पाहून इकडे रिशूचा जळफळाट व्हायला लागतो. रिशूचा राग सिनेमाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातो आणि मृत्यूचं तांडव सुरु होते. सस्पेंन्स, छळ, ड्रामा, रोमान्स आणि मरण याचा खेळ ‘फिर आई हसीन दिलरुबा’च्या ट्रेलरमधून दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू सोबत विक्रांत आणि सनी कौशल पहायला मिळणार आहे.

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हसीन दिलरुबा चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यात आता या चित्रपटाचा सिक्वेल आल्यानं प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.’फिर आई हसीन दिलरुबा’च्या ट्रेलरमधून हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा खिळवून ठेवणारा आहे, असं यावेळी सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here