Pimpalgaon Malvi:पिंपळगाव माळवी येथील मंदिरात चोरी करणारा जेरबंद

पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे.

0
पिंपळगाव माळवी येथील मंदिरात चोरी करणारा जेरबंद

Crime News : नगर : पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात (Savata Maharaj Temple) चोरी (theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद (Imprisoned) करण्यात आले आहे. यावेळी आरोपींकडून एक लाख रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा :  शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

श्रीकृष्ण बबन रायकर यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. पिंपळगाव माळवीतील संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट व रुक्मिणीच्या गळयातील मणीमंगळ सुत्रातील सोन्याचे ४ मणी असा एकूण सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. दाखल झालेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : निवेदिता माझी ताई’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या गुन्ह्याचा तपास करत असताना राहुल नानासाहेब शिंदे (वय-२४ वर्ष रा. वडगाव गुप्ता,ता. जि.अहमदनगर) व कुणाल विजय बनसोडे (वय-२३ वर्ष राहणार वडगाव गुप्ता, ता. जि. अहमदनगर) यांनी ही चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना वडगाव येथे पाठविले. या पोलीस पथकाने वडगाव गुप्ता येथुन सापळा रचून आरोपींना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे. यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडे एक नटराज देवताची मूर्ती मिळून आली. या आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here