
नगर : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Election 2026) मोठी घडामोड घडली आहे. येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनीत १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या (19 washing machines were seized) आहेत. काल (ता.१२) रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार
राज्यासह पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाची एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके महापालिका हद्दीत कार्यरत करण्यात आली आहेत.
अवश्य वाचा: संक्रांत साजरी करता,मात्र आदला आणि नंतरचा दिवस का महत्वाचा आहे ? जाणून घ्या…
गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप (Pimpri Chinchwad Election 2026)
१२ जानेवारीला रात्री १०.२३ वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफ.एस.टी.भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका गाडीमध्ये जवळपास १९ वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले आहे.
पुण्यात उमेदवारांकडून मतदारांना अजब ऑफर्स (Pimpri Chinchwad Election 2026)
पिंपरी चिंचवडमधील धनदांडग्या उमेदवारांनी यंदा निवडून येण्यासाठी प्रचंड आर्थिक ताकद लावली होती. यापैकी काही उमेदवारांनी चारचाकी गाडी, थायलंडची पाच दिवसांची टूर, एक गुंठा जमीन अशा ऑफर्स दिल्या जात आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी इच्छुक अशा प्रकारे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कसब्यात प्रभाग क्रमांक २५ मध्ये पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना थेट बक्षीस म्हणून हेलिकॉप्टर राईड देण्यात आली होती. तर पुण्याच्या प्रभाग क्रमांक १ (लोहगाव-धानोरी) मध्ये एका इच्छुकाने चक्क ११ गुंठे जमिनीचे प्लॉट लकी ड्रॉद्वारे देण्याचे आश्वासन दिले होते.


