Weather Update:राज्यातून गुलाबी थंडी गायब;पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता 

0
Weather Update:राज्यातून गुलाबी थंडी गायब;पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता 
Weather Update:राज्यातून गुलाबी थंडी गायब;पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता 

Weather Update: सध्या हिवाळा सुरु असला तरी राज्यातून गेल्या काही दिवसांपासून थंडी (Cold) गायब झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आहे. परिणामी, राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान (Tempreture) हळूहळू २-३ अंशांनी वाढणार आहे. इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण (Rainy Climate) तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे.

नक्की वाचा : शालेय गणवेश देण्याच्या निर्णयात पुन्हा बदल;पूर्वीप्रमाणेच मिळणार गणवेश

पुण्यात १७ ते २० अंश सेल्सियस तापमानाची नोंद (Weather Update)

राज्यात थंडीचा जोर कमी झाला असून तापमान वाढलं आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात १७ ते २० अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये १६.४, कोल्हापूर १७.७ अंशांची नोंद झाली. नगरमध्ये १८,सोलापूरात २२ अंश एवढं तापमान होतं. मराठवाड्यात बीड, लातूरमध्ये २० अंश सेल्सियसची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. हिंगोलीत गारठा वाढलेला होता. तिथे १६.५ अंश सेल्सियस तापमान होतं.

अवश्य वाचा : ‘त्या’ आरोपींच्या पाठीशी कोण याची उकल व्हायला हवी, निलेश लंकेचं मस्साजोगमध्ये विधान  

राज्यात पुढील पाच दिवसात कसं असेल तापमान? (Weather Update)

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश,पंजाब,राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या २४ तासांत किमान तापमानात हळूहळू २-४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here