Pink Rickshaw नगर : महिलांना रोजगाराची (Women Empowerment) संधी उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. मात्र आता महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. पिंक रिक्षा (Pink rickshaw) असं या योजनेचे नाव आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे.
नक्की वाचा : राेहित पवारांचे साेशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा घाट
पिंक रिक्षा ही योजना महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू करणार आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणांचा समावेश आहे. भारतात या पिंक रिक्षा महिलांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय ठरणार आहेत. या रिक्षांमधून महिलांचा छळ आणि गैरवर्तन पूर्णपणे टाळता येईल. महिला सुरक्षेसाठी पॅनिक बटन सह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यासारखे विशेष फीचर या रिक्षात बसवण्यात आले आहेत.
हेही वाचा : नगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली
पिंक रिक्षा ही पूर्णपणे गुलाबी रंगाची आहे. त्याचे छत गुलाबी रंगाचे आहे. महिलांसोबत गैरवर्तन तसेच लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून संरक्षणासाठी भारत सरकारने रांचीमध्ये या रीक्षासंदर्भात पहिले पाऊल उचलले आहे. पहिल्यांदा रांचीमध्ये 2013 साली पिंक रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. काही काळांतर भारतात अनेक शहरांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पिंक ऑटो रिक्षामध्ये महिलाच चालक आणि प्रवासी देखील महिलाच असतील, ज्यामुळे महिलांना रोजगारही मिळेल आणि महिलांचा प्रवासही सुरक्षित होईल .